अंत्री बुद्रुकमध्ये एक काेरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:17+5:302020-12-05T05:07:17+5:30

शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे गुरुवारी एक कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आला. बुधवारी ११७ अँटिजेनच्या टेस्ट घेण्यात ...

A carona positive in the intestinal bud | अंत्री बुद्रुकमध्ये एक काेरोना पॉझिटिव्ह

अंत्री बुद्रुकमध्ये एक काेरोना पॉझिटिव्ह

शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे गुरुवारी एक कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आला. बुधवारी ११७ अँटिजेनच्या टेस्ट घेण्यात आल्या होत्या, यामध्ये हा एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यात आता सहा रुग्ण असून हे सर्व होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आता एकही रुग्ण उपचाराखाली नाही.

आतापर्यंत तालुक्यातील ९८ पैकी ९३ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आजअखेर तालुक्यात १० हजार ५६७ अँटिजेनची, तर ६ हजार ८३१ घशातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोन हजार १८३ रुग्ण आढळले असून यापैकी दोन हजार ९१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ रुग्ण उपचाराखाली असून हे सर्व होम आयसोलेशनमध्ये आहेत. आजअखेर शिराळा शहरातील १४ रुग्णांसाह तालुक्यातील ९२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण ४.२ टक्के आहे.

Web Title: A carona positive in the intestinal bud