शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गलाई व्यावसायिक ‘पर्ल्स’मुळे हवालदिल

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

कोट्यवधींची गुंतवणूक : खानापूर तालुक्यात ७000 एजंट

दिलीप मोहिते : विटा ::अवघ्या ६ वर्षे ३ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्यासह एजंटांना दुचाकी व चारचाकी गाडी देण्याचा दावा करणाऱ्या आणि सध्या वादात सापडलेल्या ‘पर्ल्स’ कंपनीत खानापूर तालुक्यातील परराज्यात स्थायिक झालेले सोने-चांदी व्यवसायातील गलाई बांधवांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र पर्ल्स कंपनीबाबत उलटसुलट वृत्त येताच गलाई बांधव धास्तावले आहेत. तालुक्यात कंपनीचे सुमारे सात हजार एजंट कार्यरत असल्याचे वृत्त असून, आता या एजंटांच्या दारात अनेक गुंतवणूकदारांनी ठाण मांडले आहे.२००३-०४ च्या सुमारास खानापूर तालुक्यात पर्ल्स कंपनीची एन्ट्री झाली. त्यानंतर एजंटांचा शोध घेत कंपनीच्या जुन्या एजंटांनी खानापूर तालुक्यात नवीन एजंटांचे जाळे विणले. तालुक्यात सोने-चांदी व्यवसाय मोठा असल्याने परराज्यात स्थायिक झालेल्या गलाई बांधवांना एजंटांनी लक्ष्य केले. अनेक गलाई बांधवांनी गुंतवणूक केली. त्यातच एजंटांनाही सुरुवातीला मोठे कमिशन दिले जात असल्याने कालांतराने काही गलाई बांधवांनीही एजंटांची माळ स्वत:च्या गळ्यात अडकवून घेतली.गलाई बांधवही एजंट झाल्याने कंपनीला सुवर्णनगरीत चांगले दिवस आले. आता कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी थेट एजंटांना लक्ष्य करीत गुंतवलेले पैसे परत देण्याची मागणी सुरू केली आहे.२०१२ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार खानापूर तालुक्यात ३ हजार ५०० एजंट एकट्या पर्ल्स कंपनीचे काम करीत होते. त्यानंतर या एजंटांत वाढ झाल्यानंतर एजंटांचे संख्याबळ सुमारे सात हजारांपर्यंत पोहोचले. कंपनीत तालुक्यातील सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे समजते. त्यामुळे हे पैसे काढून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी एजंटांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एजंटही हवालदिल झाले आहेत.सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या माजी सैनिकांना गाठून कंपनीतील गुंतवणुकीचे फायदे पटवून देत त्यांना गुंतवणूक करण्यास एजंट भाग पाडत होते. काही शेतकऱ्यांनीही कमी कालावधित दामदुप्पट होत असल्याने उसाचे पैसे गुंतवल्याचे उजेडात आले आहे.