शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

देशी गाईचे खोंड देऊन भांडवले कुटुंबाला आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 3:02 PM

Shilala Help Sangli : सांगली जिल्हयातील पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी भांडवले यांना देशी गाईचे खोंड देऊन या कुटुंबाला आधार दिला. 

ठळक मुद्देदेशी गाईचे खोंड देऊन भांडवले कुटुंबाला आधार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाडळी गावातील वसंत पाटील कुटुंबीयांची मदत

विकास शहा 

शिराळा : सांगली जिल्हयातील पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी भांडवले यांना देशी गाईचे खोंड देऊन या कुटुंबाला आधार दिला. 

एखाद्यावर संकट आले की त्यास मदतीचा हात देण्याची संस्कृती आहे, मग ती मदत आर्थिक असो की वस्तू रुपात की श्रमदान असो. पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. होत्याचे नव्हते झाले. याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी देशी गाईचे खोंड गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देऊन या कुटुंबाला आधार दिला.तात्यासाहेब याच्या गोठ्यास आग लागून सहा जनावरे, कोंबड्या, शेळ्या यांचा मृत्यू झाला तर शेती औजारे, संसारउपयोगी साहित्य आदी जाळून गेले. अनेकांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली. मात्र पाडळी येथील वसंत पाटील यांच्या पत्नी वंदना, मुले इंजिनिअर चंद्रकांत, पोलीस संतोष, निवृत्त आर्मी इन्स्पेक्टर अमृतराव या कुटुंबानी या भांडवले  कुटुंबाला ६ महिन्याचे पाडे दिले. यावेळी भीमराव पाटील, आदीकराव पाटील , सागरपाटील , प्रशांत पाटील , जगन्नाथ पाटील , लक्ष्मण पाटील उपस्थित होते.दि.१२ रोजी सित्तुरवरून खरेदीसाठी लोक आले, मात्र त्यांनी हे पाडे विकले नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  त्यांनी भांडवले कुटुंबाला पाडे देण्याचे ठरवले होते आणि आजच त्यांच्या घरी नातीचा जन्म झाला.  त्यामुळे भांडवले यांना मदत करून त्यांनी आपली माणुसकीची परंपरा जपली.  तात्यासाहेब यास बैलगाडी शर्यतीचा नाद आहे.त्यांना आज देशी गाईचे खोंड दिल्याने तात्या व त्यांचे कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

या अगोदरही दि.१५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पहिल्या नातवाच्या बारश्याचा खर्च टाळून शहीद कुंडलिक केरबा माने कुटुंबियांना २० हजार रुपये मदत केली होती. गेल्या सात वर्षांपासून पाडळी हे गाव फटाकेमुक्त केले. माजी सैनिकांचा मेळावा व सत्कार केला. पाडळी जिल्हा परिषद शाळेस २५ हजार रुपयांची मदत तसेच पुस्तके वाटप, मूक बधिर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्याबरोबर घरच्या मुलांचे वाढदिवस साजरा केला जातो. तालुक्यातील शहीद जवानांच्या वीरमाता यांचा सत्कार , महाड येथील देवदूत बसंत कुमार यांचा सत्कार व मदत असे अनेक सामाजिक कार्य व मदतीचा हात दिला आहे. पाडळी येथील वसंत पाटील यांच्या घरी एक नातू १५ ऑगस्ट दिवशी तर एक नात गुढी पाडव्या दिवशी जन्मलेली आहेत.

 

टॅग्स :shirala-acशिराळाSangliसांगली