शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म; बंडखोरी टाळण्यासाठी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:35 IST

फोनवरुन निरोप

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे, तरीही उमेदवारी निश्चितीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरुच आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट बुधवारी सकाळी एबी फॉर्म दिला जाणार आहे. उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खल सुरु राहिला.निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी अंतिम मुदत असताना, सर्वच प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी थंडा करके खाओ ’ अशी भूमिका घेतली आहे. डावपेच ऐनवेळी उघड करण्याची रणनीती आखली जात आहे. उमेदवारीबाबतची अनिश्चितता वाढत चालल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे.महायुतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांच्या बैठका सुरू आहेत. युतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेसोबत युतीच्या वाटाघाटी सुरु होत्या.राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील हे नेते उमेदवार निश्चित करण्यासह जागावाटपाबाबत चर्चा करत होते. रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरुच होते, मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना उमेदवार निश्चित करताना डोकेदुखीचा सामना करावा लागला.बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले. महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे बुधवारी सकाळी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे.फोनवरुन निरोपसर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारी जाहीर होताच बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी पक्षांनी थेट उमेदवारी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना थेट फेानवरुन पक्षाकडून निरोप देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad: Candidates to Get AB Forms Directly to Prevent Rebellion

Web Summary : To avoid rebellion, Sangli Zilla Parishad candidates will receive AB forms directly. Political parties are finalizing candidates amid intense competition and strategic maneuvering before the deadline.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी