शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा, सांगलीतील ख्रिस्ती समाजातर्फे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:40 IST

चार तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता

सांगली : भाजपचे आमदारगोपीचंद पडळकर यांनी खिश्चन धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. पडळकर आणि शासनाच्या निषेधाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.ख्रिस्ती समाजाचे मार्गदर्शक राम कांबळे, सॅम्सन तिवडे, गॅब्रिएल तिवडे, आकाश तिवडे, किरण आरवाट्टगी, मनोज रणधीर, विजय बनकरी, दादासाहेब कस्तुरे, विशाल कांबळे, विकास मगदूम, पॉल करा, पॉल चॉको, राजू होळकर, राजू कांबळे, प्रकाश तिवडे, अजित कदम, आदींच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांनी पावसात मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. चार तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता.निवेदनात म्हटले की, दि. ६ जूनला आमची बहीण रुतुजा राजगे यांनी आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. पण, आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ जूनला सांगलीमधील राममंदिर चौकात सभा घेऊन प्रसार माध्यमातून भाषणात ख्रिस्ती पादरी (धर्मगुरू) त्यांचा सैराट करा, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हटले आहे. याप्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी ख्रिस्ती समाजाने केली.

आंदोलकांच्या मागण्या

  • गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून आमदारकी रद्द झालीच पाहिजे.
  • महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू व त्यांचे कुटुंब यांना संरक्षण मिळावे
  • महाराष्ट्रातील सर्व उपासना मंदिर (चर्च)ला संरक्षण द्या
  • ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची सी.बी.आय.मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा