मिरजेत शासकीय परिचारिका महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय सेवेला गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:48 AM2024-02-15T11:48:34+5:302024-02-15T11:49:07+5:30

पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती

Cabinet approves establishment of Miraj Government Nursing College | मिरजेत शासकीय परिचारिका महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय सेवेला गती मिळणार

मिरजेत शासकीय परिचारिका महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय सेवेला गती मिळणार

मिरज : मिरजेत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. मिरजेत अनेक वर्षांपासून नर्सिंग महाविद्यालयाची गरज होती. वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या प्रशिक्षित व तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध होण्यासाठी येथे नर्सिंग कॉलेजची वैद्यकीय क्षेत्राची मागणी होती. 

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पाठपुरावा केल्याने बुधवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिरजेत १०० प्रवेश क्षमतेच्या परिचारिका महाविद्यालयास मंजुरी व निधीची तरतूद करण्यात आली. सोबतच राज्यातील सहा परिचारिका महाविद्यालयांसाठी १०७ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. मिरजेत परिचारिका महाविद्यालय स्थापनेमुळे या परिसरात वैद्यकीय सेवेला आणखी गती मिळणार असल्याचेही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

Web Title: Cabinet approves establishment of Miraj Government Nursing College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.