शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शक्तिपीठ महामार्गातून नृसिंहवाडी, आदमापूर, पन्हाळा, सांगलीसाठी उपमार्ग

By संतोष भिसे | Updated: February 24, 2024 18:21 IST

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता

संतोष भिसेसांगली : नागपूर ते गोवा या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे अनेक धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. यामध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त देवस्थानाचाही समावेश आहे. त्याच्यासाठी मुख्य महामार्गातून उपमार्ग काढण्यात येणार आहे. महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्याचे रेखांकन जाहीर झाले आहे.पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होणाऱ्या या महामार्गाद्वारे माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई, पत्रादेवी ही देवस्थाने प्रामुख्याने जोडली जाणार आहेत. अर्थात, ती महामार्गावरच असल्याने स्वतंत्र उपमार्गांची आवश्यकता नाही. नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान, ऐतिहासिक पन्हाळा यांच्यासाठी मात्र उपमार्ग काढले जाणार आहेत. सांगली, गारगोटी, पट्टणकोडोली, कोल्हापूर बायपास यांच्यासाठीही उपमार्गांचे नियोजन आहे.

हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. तेथील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी या उपमार्गांची आखणी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ५७ किलोमीटर, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२३ किलोमीटर असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ किलोमीटर असणार आहे. सांगलीनजीकच्या कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर, सांगलीवाडी या गावांमधून महामार्ग जाईल. तेथून सांगली शहरासाठी उपमार्ग निघेल.सांगली जिल्ह्यात बाणुरगड (ता. खानापूर) येथे तो प्रवेश करेल. तेथून तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी(ता. तासगाव) असा प्रवेश करेल. मतकुणकीमधून मिरज तालुक्यात प्रवेश करेल. कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी असा जाईल. यातील काही गावांत महामार्गासाठी चिन्हांकनाची कामे सुरू झाली आहेत.

२०२७ चे उद्दिष्टहा महामार्ग २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे महामार्ग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. सहा पदरी महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. ठिकठिकाणी पथकर नाकेदेखील असतील. सुमारे ८०५ किलोमीटर लांबीचा हा महामार्गा समृद्धीपेक्षाही लांब अंतराचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा असेल.

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थतामहामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार सांगली जिल्ह्यातील बहुतांश बागायती क्षेत्रातून तो जाणार आहे. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या कष्टाने फुलविलेल्या बागायती महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. मात्र, भूसंपादनाच्या भरपाईविषयी अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग