शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

By संतोष भिसे | Updated: October 15, 2022 19:21 IST

वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील.

सांगली : गाडी चालवताना चालकाची डुलकी घालवून सावध करण्याचे काम आता बझर करणार आहे. चालकासमोर बसवलेला बझर डुलकीची नोंद घेऊन तीव्र आवाज करेल, आणि चालकाला जागा करेल. या तंत्रज्ञानाचा वापर व्यापक स्वरुपात व्हावा असा सूर आल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कौन्सिलच्या बैठकीत व्यक्त झाला. दिल्लीतील बैठकीला देशभरातून १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.टाटा कंपनीने ट्रकमध्ये बझर प्रणाली बसविली आहे. याचा संदर्भ देत परिवहन आयुक्त विवेक भिमण्णावर म्हणाले, सर्व वाहनांमध्ये या प्रणालीचा वापर आवश्यक आहे. प्रदीर्घ काळ वाहन चालवल्याने चालकाला थकवा व डुलकी स्वाभाविक आहे, अशावेळी गाडीतील बझर चालकाच्या चेहऱ्यावरील बदल लक्षात घेऊन डुलकीपासून जागा करेल. रस्त्यावरील कॅमेरेही गाडीच्या धावण्याची अवस्था पाहून चालकाला सतर्क करतील.मुख्य परिवहन सचिव आशिषकुमार सिंग म्हणाले की, चालकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे सिम्युलेटर तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठीही वापरात येईल. वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील.असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, नादुरुस्त रस्ते आणि सोयीसुविधांअभावी अपघात वाढताहेत. महत्वाच्या रस्त्यांवर साधे दिशादर्शक फलकही नसतात. अनधिकृत हमाली, वारणी, मामुली, चायपाणी, चपाल, दिवाणजी खर्च या विषयावरही त्यांनी विवेचन केले. बैठकीला सांगलीतून प्रकाश गवळी, राजशेखर सावळे, प्रदीप पाटील, संभाजी तांबडे, प्रीतेश कोठारी, कैलास गोरे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.बंद जकात नाके टर्मिनलसाठी वापराबैठकीत पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की, देशभरात जीएसटीची अंमलबजावणी २०१७ मध्ये सुरु झाल्यावर जकात नाके बंद झाले. अनेक महानगरांमध्ये नाक्याच्या जागा रिकाम्या पडून आहेत. त्यांचा वापर ट्रक टर्मिनलसाठी करण्यास मुभा द्यावी.रस्ते खराब असल्यानेच लेन कटींगपदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गावर वाहनांनी मार्गिकांचे उल्लंघन करु नये असा नियम आहे. पण सर्रास महामार्गांवर डाव्या बाजुच्या मार्गिका अत्यंत खराब आहेत, त्यामुळेच नाईलाजाने लेन कटींग करावे लागते. रस्ते चांगले झाल्यास अशी वेळ येणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात