शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

Sangli: आटपाडीत फुलणार बटरफ्लाय गार्डन, अडीच एकर क्षेत्राचे होणार नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:07 IST

आटपाडी : आटपाडी शहरातील नगरपंचायत हद्दीमध्ये अडीच एकर क्षेत्रामध्ये बटरफ्लाय गार्डन उभारले जाणार असून त्याचा शुभारंभ नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव ...

आटपाडी : आटपाडी शहरातील नगरपंचायत हद्दीमध्ये अडीच एकर क्षेत्रामध्ये बटरफ्लाय गार्डन उभारले जाणार असून त्याचा शुभारंभ नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे, अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दिग्विजय देशमुख, भगवान मोरे, बळवंत मोरे, बाळासाहेब पाटील, भाऊसाहेब गायकवाड, ऋषिकेश देशमुख, दादासाहेब पाटील, अमोल काटकर उपस्थित होते.केंद्र शासनाच्या भांडवली २०२२-२०२३ मधील भांडवली गुंतवणुकीतून राज्य शासनाला आलेल्या विशेष सहाय योजनेंतर्गत सुमारे चार कोटींचा निधी नगरपंचायतला प्राप्त झाला आहे. यातून बटरफ्लाय गार्डनमध्ये रस्ते, प्रवेश प्लाझा, सुरक्षा दालन, नागरिकांना बसण्यासाठी सुविधा, ॲम्पीथिएटर, वॉकिंग ट्रॅक, फुलपाखरे बघण्यासाठी विशेष बैठक व्यवस्था, संरक्षक भिंत याचबरोबर अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.आटपाडी शहरामध्ये एकाच ठिकाणी सुमारे पन्नास एकरहून अधिक क्षेत्र बिगरशेती करण्यात आले आहे. यातील नगरपंचायतसाठी वर्ग करण्यात आलेल्या अडीच एकर जागेवर थेट केंद्राचा चार कोटी आठ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

बटरफ्लाय गार्डन झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पडणार आहेच. शिवाय नागरिकांना एक विरंगुळा केंद्र, शिवाय विविध फुलपाखरे, फुलांची झाडे, वृक्ष पहायला मिळणार आहेत. नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायतच्या जागेवर केंद्र शासनाचा थेट प्रथमच निधी प्राप्त झाला आहे. अद्ययावत असे बटरफ्लाय गार्डन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट असे गार्डन लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. - अमरसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :Sangliसांगली