शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पाच लाखांसाठी मुलाच्या अपहरणाची व्यावसायिकास चिठ्ठीने धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:40 IST

फिल्मी स्टाईलने खंडणी मागणाऱ्याने फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलिसही चक्रावले

मिरज : मिरजेत महेश पाटील या व्यावसायिकास अज्ञाताने चिठ्ठीद्वारे पाच लाखांच्या खंडणीसाठी मुलाच्या अपहरणाची धमकी दिली. फिल्मी स्टाईलने खंडणी मागणीच्या या घटनेची महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.मिरजेत पंढरपूर रस्त्यावर मगदूम मळा येथे राहणारे महेश रावसाहेब पाटील यांचा डेअरी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. महाराष्ट्रात व कर्नाटकात त्यांची कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोर असलेल्या दत्त मेडिकल या दुकानासमोर एक पाकीट ठेवले होते. पाकिटावर महेश पाटील यांचे नाव असल्याने दुकानदाराने ते पाटील यांना आणून दिले. पाकिटातील चिठ्ठीत महेश पाटील यांना उद्देशून, तुझा ११ वर्षांचा मुलगा आराध्य याचे अपहरण करण्यापूर्वी पाच लाख रुपये दे, नाहीतर मुलास गायब करेन. पोलिसांना किंवा इतर कोणाला कळविले तर मुलगा परत मिळणे कठीण होईल, अशी धमकी होती. पाच लाख रुपये पंढरपूर रस्त्यावरील धनगरी ढाब्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये रात्री आठनंतर आणून ठेवण्यास सांगितले होते. महेश पाटील यांनी चिठ्ठीसह पोलिसांत धाव घेत अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. फिल्मी स्टाईलने खंडणी मागणाऱ्याने फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलिसही चक्रावले आहेत.पोलिसांनी औषध दुकानातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता तेथे चिठ्ठी टाकणाऱ्याचे कॅमेऱ्यात चित्रण झालेले नाही. पाटील यांना कर्नाटकात वेगवेगळी कामे मिळाल्याचाही चिठ्ठीत उल्लेख असल्याने पाटील यांच्या परिचिताचे हे कृत्य असल्याचा संशय आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून संशयिताचा शोध सुरू असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस