शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

चुकीच्या गतिरोधकामुळे उद्योजकाचा बळी, सांगलीतील घटना

By शीतल पाटील | Updated: October 16, 2023 13:50 IST

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सांगली : शहरातील अप्पासाहेब बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेल्या चुकीच्या गतिरोधकामुळे शहरातील एका उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा बळी गेला. विजय रामाप्पा मगदूम (वय ५५ मूूळ गाव वाळवा सध्या रा. कॉलेज कॉर्नर, सांगली) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. यात गतिरोधकावर दुचाकी जोरात आदळल्याने तोल जाऊन खाली पडल्यानंतर डोक्याला मार लागल्याने मगदूम यांचा मृत्यू झाला.मृत मगदूम हे कॉलेज कॉर्नर परिसरातील विपुल प्लाझा या अपार्टमेंटमध्ये राहण्यास होते. व्यवसायाबरोबरच एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करत होते. यासह इतरही सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असे. शनिवारी रात्री आपल्या मोपेडवरून बापट मळा परिसरात कामानिमित्त गेले होते. तेथून ते घरी परतत असताना बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेला गतिरोधक त्यांना दिसला नाही. यामुळे दुचाकी गतिरोधकावरून जोरात आदळून पुढे गेली.यातच तोल गेल्याने ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज आल्यानंतर परिसरात असलेल्या सुरक्षारक्षक व काही तरुण मदतीसाठी तिथे आले. गंभीर जखमी अवस्थेत मगदूम यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले.शहरातील उपनगरामध्ये कोणत्याही नियमांचे पालन न करता गतिरोधक करण्यात आले आहेत. यावर कोणत्याही प्रकारचे पांढरे पट्टे नसतात. त्यामुळे वाहनधारकांना ते दिसून येत नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या गतिरोधकामुळेच हा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला.

अपघाताचा व्हिडीओ व्हायरलशहरातील सामाजिक उपक्रमात मगदूम यांचा सहभाग असे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच त्यांचे सहकारी दाखल झाले. बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेल्या एका सीसीटीव्हीमध्येही हा अपघात चित्रीत झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. समाजमाध्यमावरही नागरिकांनी चुकीच्या गतिरोधकाबद्दल संताप व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू