तासगावमध्ये पावणेतीन लाखांची घरफाेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:03+5:302020-12-12T04:43:03+5:30
तासगाव : तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात डॉक्टरच्या बंद बंगल्याचे कुलूप ताेडून अज्ञात चाेरट्यांनी राेख रक्कम, साेन्याचे दागिने असा ...

तासगावमध्ये पावणेतीन लाखांची घरफाेडी
तासगाव : तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात डॉक्टरच्या बंद बंगल्याचे कुलूप ताेडून अज्ञात चाेरट्यांनी राेख रक्कम, साेन्याचे दागिने असा पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याबाबत डॉ. सुरेश शिवाजीराव पवार) यांनी तासगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तासगावमधील गणेश कॉलनीत डॉ. सुरेश पवार (वय ४५) यांचा स्वप्नपूर्ती नावाचा बंगला आहे. बुधवार, दि. ९ राेजी दुपारी ३ वाजता ते कामानिमित्त बंगल्यास कुलूप लावून बाहेरगावी गेले हाेते. ही संधी साधून चाेरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप ताेडून घरातील अडीच लाख रुपयांची राेख रक्कम तेसच २५ हजार रुपयांचे साेन्याचे टॉप असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी सकाळी ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. पवार यांनी तासगाव पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्याविराेधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.