शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:12 IST

परिसरात सीसीटीव्ही नाही

सांगली : शहरातील अभयनगर परिसरातील माळी वस्तीत महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंद बंगला फोडून चोरट्याने पंधरा तोळे सोन्याचे दागिने व ३० हजारांची रोकड, असा मुद्देमाल लंपास केला. संपूर्ण कुटुंब दिवाळीनंतर सहलीला गेले असताना चोरट्याने डाव साधला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घरफोडीची पोलिसांत नोंद झाली आहे.याबाबत महापालिकेचे निवृत्त कर्मचारी दादासाहेब भीमराव सावळजकर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दादासाहेब सावळजकर हे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. ते निवृत्त झाले आहेत. अभयनगर येथील माळी वस्तीत गल्ली क्रमांक-१ मध्ये त्यांचा बंगला आहे. दिवाळीनंतर ते कुटुंबीयांसह म्हैसूर उटीच्या सहलीस गेले होते.

चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील पंधरा तोळ्याचे दागिने आणि तीस हजारांची रोकड लंपास केली. कपाट फोडण्यासाठी चोरट्याने घरातील कुदळीचा वापर केला. चोरट्याने मुख्य दरवाजाला आतून कडी घातली. त्यानंतर स्वयंपाकघरातील दरवाजातून तो बाहेर पडला.सावळजकर कुटुंबीय मंगळवारी सायंकाळी घरी परतले. त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. बंगल्यात प्रवेश करताच कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे कळले. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक किरण स्वामी, पोलिस हवालदार असीफ सनदी, सुदर्शन खोत, सूरज मुजावर, अनिकेत शेटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. भरवस्तीत झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

परिसरात सीसीटीव्ही नाहीमाळी वस्ती परिसरात सावळजकर यांच्या बंगल्याशेजारी अनेक बंगले आहेत. नागरी वस्तीही दाटीवाटीची आहे. तरीही या भागात एकही सीसीटीव्ही नव्हता. विशेष म्हणजे शेजारी भिंतीला भिंत लागून घर असूनही त्यांना चोरी झाल्याचे समजले नाही. सराईत चोरट्यानेच ही चोरी केल्याचा अंदाज असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Retired Employee's House Burglarized; Gold, Cash Stolen

Web Summary : A retired Sangli Municipal Corporation employee's house was burglarized. Fifteen tolas of gold and ₹30,000 cash were stolen while the family was on vacation. Police are investigating the incident, complicated by the lack of CCTV in the area.