'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या" बैलजोडीनं पटकावला पहिला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 22:35 IST2025-03-16T22:34:50+5:302025-03-16T22:35:17+5:30
महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती ही या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. मुख्य संयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीगडे यांनी हे तिसरे पर्व यशस्वी केले.

'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या" बैलजोडीनं पटकावला पहिला मान
प्रताप बडेकर
कासेगाव - कासेगाव ता.वाळवा येथील मैदानात झालेल्या 'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या"ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानाची हिंदकेसरी जोडी. तब्बल ५ लाख १६,२६५ रुपये व मानचिन्ह पटकावले. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी जि. प अध्यक्ष देवराज पाटील,खंडेराव जाधव,संयोजक अतुल लाहीगडे आदी उपस्थित होते.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस भव्य अशा मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.राज्यभरातून जवळपास ४०० पेक्षा जास्त बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.सर्व सहभागी स्पर्धक बैलगाडी मालकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित,डोळ्याचे पारणे फिटेल अशा पध्दतीने अंतिम फेरी झाली. अतिशय चुरशीच्या फेरीत शंभू-चिमण्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्वर्गीय शरद आण्णा लाहीगडे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नेटके संयोजन केले होते. महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती ही या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. मुख्य संयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीगडे यांनी हे तिसरे पर्व यशस्वी केले.
मैदानास हिंदकेसरी 'किताब
कासेगाव येथें जयंत केसरी स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते.दर्जा,पारदर्शक पणा, सोयी-सुविधा व व्यवस्थापन पाहून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने या मैदानास हिंदकेसरी 'किताब देण्यात आला. सांगली जिल्ह्याला हा पहिलाच मान मिळाला. त्यामुळे सर्वांनी संयोजक अतुल लाहीगडे यांचे कौतुक केले.कासेगाव ग्रामस्थांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला.