चिंचणी येथे बैलगाडी शर्यततीत मारामारी; दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 12:32 IST2023-05-21T12:30:56+5:302023-05-21T12:32:03+5:30
मेरवे खोरा येथे शनिवार रोजी बैलगाडी शर्यततीचे आयोजन करण्यात आले होते.

चिंचणी येथे बैलगाडी शर्यततीत मारामारी; दोन जखमी
मोहन मोहिते
चिंचणी ( ता . कडेगांव ) येथे मेरवे खोरा येथे शनिवार रोजी बैलगाडी शर्यततीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी बैलगाडी नोंद करण्यास सुरुवात झाली असता आरोपी प्रविण मानाजी सुर्यंवशी रा. तडसर हा रांगेतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादी सुरेश शिवाजी यादव यांनी अटकाव केल्यामळे प्रवीण याने वादावादी केली व निघून गेला. त्यानंतर दुपारी १ वाजता आरोपी 1) प्रणिव मानाजी सुर्यवंशी, 2) अर्जुन सुर्यवंशी, 3) अक्षय रविद्र दबाणे. 4) सागर मिकाजी इंगळे 5)संकेत बाळू कदम, 6) सुरज कृष्णत रोठे, 7) श्रीकांत लालास कदम, 8) दत्तात्रय आनंदा सुर्यवांशी 9) विश्वजीत मारुती जाधव, 10) महेश तानाजी हॉलगु सर्व रा तडसर ता. कडेगाव जि. सांगली हे परत आले.
परत येऊन बेकायदा जमाव जमवून आरोपी प्रवीण याने सुरेश यास खाली पाडून त्याचे हातातील कु-हाडीने तसेच त्याच्या बरोबर असणाऱ्या बाकीच्या आरोपीनी त्याचे हात्तील गुप्तीने पाटीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तेथे पडलेला दगड मारून जखमी केले आहे. काठीने, लाथाबुक्यानी मारहाण केली. प्रणित यादव हा सोडविण्यासाठी गेला असता त्यास हातातील काठीने पाठीत मारहाण केली. सुरेश यादव हा गंभीर जखमी असून त्याना कडेपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद शनिवार रात्री उशिरा चिंचणी वांगी पोलिसात झाली असून अधीक तपास उप पोलीस निरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत.