सांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:27 AM2021-01-02T11:27:16+5:302021-01-02T11:29:00+5:30

Sangli Morcha- डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाट वाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निषेध केला.

Bullock cart march against fuel price hike in Sangli | सांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चा

सांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चा

Next
ठळक मुद्देसांगलीत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चामदनभाऊ युवा मंचचे आंदोलन : केंद्र शासनाचा निषेध

सांगली : डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाट वाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निषेध केला.

युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, जिल्हा बँकेचे संचालक सिंकदर जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी लेंगरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या फसव्या घोषणांचा अतिरेक झाला आहे. प्रत्येकाच्या खात्यावर १४ लाख, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती.

मेक इन इंडियाचा बोजवारा उडाला आहे, तर कृषी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना महामारीत आधीच लोकांचा रोजगार गेला असून, महागाईही गगनाला भिडली आहे. केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे, महागाईबद्दल मोदी सरकार अवाक्षरही काढत नाही. या सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आनंदराव पाटील, अय्याज मुजावर, नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उपाध्यक्ष शेखर पाटील, तौफिक बिडीवाले, अमोल झांबरे, सुजित लकडे, राहुल कोळी, जुनेद महात, संजय कांबळे, राम कुट्टे, जयराज बर्गे, दिनेश सादिगले, प्रवीण निकम, प्रथमेश भंडे, संकेत आलासे, शरद गाडे उपस्थित होते.

 

Web Title: Bullock cart march against fuel price hike in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.