बुधगावात पूर्ववैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:01+5:302021-07-23T04:17:01+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पूर्ववैमनस्यातून तरुणास दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उमेश रमेश क्षीरसागर यांनी ...

In Budhgaon, a young man was beaten to death out of prejudice | बुधगावात पूर्ववैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण

बुधगावात पूर्ववैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पूर्ववैमनस्यातून तरुणास दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उमेश रमेश क्षीरसागर यांनी तेजस तानाजी पाटील व तुषार तानाजी पाटील (दोघेही रा. बुधगाव) यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार दि. २० रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी उमेश हे शेतात जाण्यासाठी दुचाकीवरून जात होते. याचवेळी पाऊस आल्याने ते एकाठिकाणी थांबले असता, संशयितांनी त्यास बोलावून घेत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली व दगडाने डोक्यात मारून जखमी केले. मराठा शाळा क्रमांक २ जवळ व नंतर विमानतळ मैदानावर नेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांत दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In Budhgaon, a young man was beaten to death out of prejudice