बुधगावात पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:51 IST2021-02-28T04:51:25+5:302021-02-28T04:51:25+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने येत वृद्धेच्या डोळ्यावर रुमाल टाकून तिच्या गळ्यातील दोन ...

In Budhgaon, the old man was robbed under the pretext of asking for water | बुधगावात पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले

बुधगावात पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने येत वृद्धेच्या डोळ्यावर रुमाल टाकून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याची बोरमाळ हिसडा मारून लांबविण्यात आली. याप्रकरणी कृष्णाबाई तुकाराम भगत-पाटील (वय ७४, रा. कुपवाड रस्ता, बुधगाव, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगाव येथे कुपवाड रोडवर कृष्णाबाई राहण्यास आहेत. शनिवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांना कुपवाडला जाण्यासाठीचा रोड कोणता असे विचारले व पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर कृष्णाबाई घरात जात असतानाच संशयिताने त्यांच्या तोंडावर रुमाल टाकून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची बोरमाळ हिसडा मारून तोडली व तो तेथून पसार झाला.

काही वेळानंतर कृष्णाबाई यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली; मात्र तो दिसला नाही. अखेर त्यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: In Budhgaon, the old man was robbed under the pretext of asking for water