महापालिकेचे बजेट ५७३ कोटींवर

By Admin | Updated: March 31, 2015 23:59 IST2015-03-31T23:58:58+5:302015-03-31T23:59:44+5:30

महासभेकडे सादर : स्थायी समितीकडून ७१ कोटींची वाढ; महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींच्या विकासनिधीत भर

The budget of the municipal corporation is 573 crores | महापालिकेचे बजेट ५७३ कोटींवर

महापालिकेचे बजेट ५७३ कोटींवर

सांगली : नागरिकांवर करांचा कोणताही बोजा न टाकता, ‘दिल मांगे मोअर’चा जमाना असल्याचे सांगत स्थायी समितीचे सभापती संजय मेंढे यांनी मंगळवारी महापालिकेचे २०१५-१६ चे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले. स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात तब्बल ७१.७८ कोटींची वाढ केल्याने पालिकेचे अंदाजपत्रक ५७३ कोटी ८९ लाख १७ हजार ७०० रुपयांवर गेले आहे. या अंदाजपत्रकात अनेक नव्या योजनांची घोषणाही त्यांनी केली.
महापालिकेच्या नगरसेवकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली. येत्या बुधवारी ८ एप्रिल रोजी अंदाजपत्रकावर चर्चा होणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी जाहीर केले.
पालिका आयुक्त अजिज कारचे यांनी २६ फेब्रुवारी रोजी ७०२ कोटी १० लाख जमेचे व २६ लाख २२ हजार शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. या अंदाजपत्रकावर स्थायी सदस्यांच्या सूचना घेऊन मंगळवारी सभापती मेंढे यांनी महासभेकडे अंदाजपत्रक दिले. स्थायी समितीने जमेच्या बाजूला ७४ कोटी ९२ लाखांची वाढ केली. यात घरपट्टीतून सहा कोटी, एलबीटीतून ६० कोटी, परवाना शुल्क एक कोटी, दंडात्मक कार्यवाही एक कोटी, नवीन बांधकाम नियमावलीतील दंडात्मक शुल्क तीन कोटी, मीटरने पाणीपुरवठा आकार २.५० कोटी, कुटुंब कल्याण केंद्र दोन कोटी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न ५७३ कोटींवर जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजपत्रकात सभापती मेढे यांनी तब्बल १५९ (पान १० वर)
(आणखी वृत्त हॅलो १)

उत्पन्नवाढीसाठी विविध शिफारशी

Web Title: The budget of the municipal corporation is 573 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.