देवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने शीर धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:45 IST2020-06-04T15:43:02+5:302020-06-04T15:45:11+5:30

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिरगाव ते कुंभारगाव या जुन्या रस्त्याकडेला जयसिंग शामराव जमदाडे (वय ४५, रा. देवराष्ट्रे) यांचा निर्घृण खून करण्यात आला.

The brutal murder of one in Devarashtra | देवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने शीर धडावेगळे

देवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने शीर धडावेगळे

ठळक मुद्देदेवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून धारदार शस्त्राने वार करुन शीर केले धडावेगळे

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिरगाव ते कुंभारगाव या जुन्या रस्त्याकडेला जयसिंग शामराव जमदाडे (वय ४५, रा. देवराष्ट्रे) यांचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करुन जमदाडे यांचे शीर धडावेगळे केले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. याठिकाणी देवराष्ट्रे, शिरगाव आणि कुंभारगावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी पाहणी केली. खुनामागील कारणाचा पोलीस तपास करीत आहेत. या घटनेची परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: The brutal murder of one in Devarashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.