शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल उद्यासाठी...विशेष शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST

‘लोकमत’ बालविकास मंच : विद्यार्थी व पालकांसाठी आयोजन

सांगली : ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शन देऊन उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले जाते. याचाच एक भाग म्हणून सध्या सातवी ते दहावीमधील विद्यार्थी व पालकांसाठी रविवार, दि. २१ रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव होऊन अभ्यासाचे महत्त्व समजेल आणि अभ्यासासंबंधीचे नियोजन व अंमलबजावणी अधिक सोपी होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आकडेमोड, ज्ञानाचा परस्पर संबंध, ज्ञानाचे उपयोजन आदी गोष्टींची गरज असते. या गरजा विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्याचा सराव शालेय जीवनातून केला, तर स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होईल. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल. या गोष्टी लक्षात घेऊन या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. इयत्ता सातवी, आठवी व नववीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘उज्ज्वल उद्यासाठी....दहावीसाठी शिक्षणाकडे झेपावताना’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)रविवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १0. ३0 वा. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तसेच सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठीही हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश - ८४८२८३६१८0 या क्रमांकावर संपर्क साधावा.