शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

विटा पालिका मिळविणार प्लास्टिक कचऱ्यातून पैसा : पेव्हिंग ब्लॉकची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:49 AM

हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली आहे.

ठळक मुद्दे घनकचरा प्रकल्पाच्या भूमीवर यशस्वी प्रयोग; पालिकेच्या उत्पन्नात पडणार मोठी भर

विटा : विटा शहरात प्रथमच टाकाऊ, खराब प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉकचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला असून, या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

शहरात नगरपरिषद दैनंदिन घंटागाडीतून ओला व सुका कचरा विलगीकरण करून घेत आहे. त्यासोबतच प्लास्टिक दररोज वेगळे संकलित केले जाते. या प्लास्टिक कचºयापासून पालिकेचे कर्मचारी घनकचरा भूमीवर पेव्हिंग ब्लॉक तयार करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून याबाबत प्रयत्न चालू आहेत.हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली आहे.

समस्या संपविण्यात यशप्लास्टिक मानवी आरोग्यास व पर्यावरणास घातक ठरत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात सर्वप्रथम प्लास्टिक बंदी यशस्वीपणे राबविली आहे. संकलित झालेल्या प्लास्टिकचे प्रकारानुसार व आकारानुसार वर्गीकरण करून त्यावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया करून पेव्हिंग ब्लॉकच्या विटा तयार केल्या आहेत. ही समस्या कायमची संपविण्यात पालिकेला यश आल्याचे नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांनी सांगितले.नगरपालिकेचा अद्ययावत प्रकल्पस्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये विटा शहर पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे. यास पूरक प्रकल्प निर्मिती पालिकेने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घनकचरा भूमीवर प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प साकारला असून, यात तयार होणाऱ्या उत्पादनास उच्चांकी मागणी असल्याचे मत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले. 

नगरपालिकेच्या उत्पन्नात भर : सर्व प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून पेव्हिंग ब्लॉक बनविण्याची क्षमता आम्ही निर्माण केली आहे. त्यातून नगरपरिषदेला उत्पन्नाचा आणखी एक स्रोत निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका