शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तलाठ्याने मागितली लाच, रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:15 IST

Bribe Case Sangli- दरीबडची (ता.जत) येथील तलाठी विलास भरमन्ना चव्हाण (वय ४८) इकराराची नोंद घेवून इकरार देण्याकरीता ५०० रूपयाची लाच स्विकारताना लााचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होती. ही घटना तलाठी काार्यलयात दुपारी १ वाजता घडली. 

ठळक मुद्दे५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडलेलाचलुचपत विभागाची कारवाई

संख : दरीबडची (ता.जत) येथील तलाठी विलास भरमन्ना चव्हाण (वय ४८) इकराराची नोंद घेवून इकरार देण्याकरीता ५०० रूपयाची लाच स्विकारताना लााचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होती. ही घटना तलाठी काार्यलयात दुपारी १ वाजता घडली. पूर्व भागातील दरीबडची व लमाणतांडा या गावी हे तलाठी तीन वर्षापासून कार्यरत आहे. दरीबडची गावातील शेतकरी श्रीशैल भीमराव पाटील नामक या व्यक्तीने सातबारा इकरार बोजा नोंदीसाठी अर्ज केला होता .तलाठी चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चअंती ५०० रूपये लाचेची मागणी केली.रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.लाच रक्कम घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.तलाटी चव्हाण यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.

पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक सुहास नाहगेड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अन्टी करप्शन ब्युरो सागली सुजय घाटगे,पोलीस निरीक्षक प्रशांत चोगुले, तसेच पोलीस अंमलदार फौजदार रविंद्र धुमाळ,पो.हे.सालीम मकानदार, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, पो.गा. प्रितम चौगुले, धनंजय खाडे, पो.कॉ. सुहेल मुल्ला यांनी केली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSangliसांगलीPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग