सांगलीत अपघातात मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:32+5:302020-12-05T05:04:32+5:30

सांगली : शहरातील भारतनगर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पाचवर्षीय मुलगा जखमी झाला. याप्रकरणी संजय आबाजी निकम ...

Boy injured in Sangli accident | सांगलीत अपघातात मुलगा जखमी

सांगलीत अपघातात मुलगा जखमी

सांगली : शहरातील भारतनगर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पाचवर्षीय मुलगा जखमी झाला. याप्रकरणी संजय आबाजी निकम (रा. भारतनगर, सांगली) यांनी अनिल काशिनाथ कोरे (रा. कोल्हापूर रोड, सांगली) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. २६ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला.

फिर्यादी निकम यांचा पाचवर्षीय अनिरुध्द हा मुलगा घराबाहेर खेळत असताना कोरे यांच्या दुचाकीने धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची सांगली शहर पोलिसात नोंद आहे.

Web Title: Boy injured in Sangli accident