शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सांगलीत अपघातात दोघे बाप-लेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:44 IST

भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसांगलीत अपघातात दोघे बाप-लेक ठारघटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन केला पंचनामा

सांगली : भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम शामलाल रामचंदाणी (३२), त्यांची मुलगी काव्या (४ वर्षे, रा. आंबेडकर रस्ता, क्रांती क्लिनिकजवळ, सीतारामनगर, सांगली) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. जखमींमध्ये मृत रामचंदाणी यांची पत्नी सोनी (२८) तसेच संतोष वासुदेव कुलकर्णी (२८) व विनायक दत्तात्रय जोशी (२७, दोघे रा. इराणी मस्जीदजवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.रामचंदाणी कुटुंब शुक्रवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असल्याने दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीएच-७६३८) गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते अकरा वाजता सांगलीला येत होते. त्याचवेळी संतोष कुलकर्णी व विनायक जोशी दुचाकीवरून (क्र. एमएच १० टीवाय-७११) सांगलीत येत होते. या दोन्ही दुचाकी पुढे-मागे काही अंतरावर होत्या. आकाशवाणी केंद्राजवळ आल्यानंतर पाठीमागून सागर माळी भरधाव मोटारीने (क्र. एमएच ०४ डीबी-४८७१) येत होता. त्याने दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये रामचंदाणी, त्यांची पत्नी व मुलगी रस्त्यावर उडून पडले.

कुलकर्णी व जोशी दोघेही त्यांच्या दुचाकीवरून खाली पडले. डोक्याला मार लागल्याने रामचंदाणी यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींना तातडीने उपचारार्थ हलविले; पण उपचार सुरू असताना काव्या रामचंदाणी या चिमुरडीचाही मृत्यू झाला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली