शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कर्जदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:50 IST

५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते 

आष्टा : कोरेगाव (ता. वाळवा) येथील अमोल पाटील व इतर तीन खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून धोंडीराम आनंद संकपाळ (रा. कोरेगाव) यांनी शनिवारी रात्री विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध रविवारी आष्टा पोलिस ठाण्यात खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडीराम संकपाळ यांचे कोरेगाव राजारामनगर (ता. वाळवा) याठिकाणी सलूनचे दुकान आहे. त्यांनी अमर दिनकर पाटील यांच्याकडून ५५ हजार रुपये, स्वप्नील नामदेव पाटील यांच्याकडून एक लाख रुपये, सागर माणिक पाटील यांच्याकडून दहा हजार, तर यशवंत पाटील यांच्याकडून ५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. कर्जाची रक्कम परत करूनही खासगी सावकारांनी संकपाळ यांच्या दुकानासमोर जाऊन वारंवार शिवीगाळ व दमदाटी केली होती. या त्रासाला कंटाळून संकपाळ यांनी विषारी औषध प्राशन केले होते. संबंधितावर खासगी सावकारीप्रकरणी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस