टाकळीत बोगस डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 21:01 IST2017-10-07T21:00:14+5:302017-10-07T21:01:38+5:30

The bogus doctor in the collapsed arrest | टाकळीत बोगस डॉक्टरला अटक

टाकळीत बोगस डॉक्टरला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : तालुक्यातील टाकळी येथे ईश्वर रूद्राप्पा कोरे (वय ४६, रा. वखार
भाग मिरज) या बोगस डॉक्टरला जिल्हा परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या
पथकाने अटक केली. टाकळीत ईश्वर कोरे हा वैद्यकीय पात्रता नसतानाही
अ‍ॅलोपॅथी औषधोपचार करीत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद वैद्यकीय
अधिकारी डॉ. रागिणी पवार, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक एस. पी. सावंत,
पोलिस हवालदार दत्तात्रय खोत यांच्या पथकाने टाकळीत कोरे याच्या
रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी कोरे याच्याकडून रूग्णांवर उपचारासाठी
वापरण्यात येत असलेली अ‍ॅलोपॅथी औषधे, रुग्णालयाचा फलक असे साहित्य जप्त
करण्यात आले. यापूर्वीही पथकाने कोरे याच्याविरूध्द कारवाई केली होती.
मात्र कोरे पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळल्याने
त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The bogus doctor in the collapsed arrest