बिरनाळ तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:26 IST2021-03-05T04:26:38+5:302021-03-05T04:26:38+5:30

जत : बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विनायक वसंत कलाल (वय २०, रा. संभाजी चौक, जत) ...

The body of a young man drowned in Birnal Lake was found | बिरनाळ तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

बिरनाळ तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

जत : बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विनायक वसंत कलाल (वय २०, रा. संभाजी चौक, जत) याचा पाण्यात बुडून बुधवारी दुपारी तीनला मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी चारच्यादरम्यान सापडला.

याप्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक कलाल मित्रांसोबत बिरनाळ तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते, परंतु मृतदेहाचा शोध लागला नव्हता. सांगली येथील दोन आपत्कालीन पथकांनी गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. सायंकाळी चारच्यादरम्यान मृतदेह सापडला. तहसीलदार सचिन पाटील व पोलीस निरीक्षक उत्तम जाधव बुधवारी रात्री दहापर्यंत घटनास्थळावर थांबून होते. मृतदेह सापडत नसल्यामुळे त्यांनी आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते.

Web Title: The body of a young man drowned in Birnal Lake was found