शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रेमसंबंधातून खून, कृष्णा नदीत फेकले; तीन दिवसांनी मसुचीवाडीत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:46 IST

कृष्णा नदीत फेकलेला मृतदेह

बोरगाव : ईश्वरपूर (ता. वाळवा) येथील रसिका मल्लेशी कदम या विवाहित महिलेचा प्रेमसंबंधातून खून करून कृष्णा नदीत फेकलेला मृतदेह तीन दिवसांनी मसुचीवाडी येथे सापडला. आरोपी तुकाराम वाटेगावकर (रा. बोरगाव) याने या खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिस आणि बचाव पथकांनी नदीपात्रात बोटींच्या साहाय्याने तीन दिवसांपासून सुरू केलेल्या शोध मोहिमेला शुक्रवारी यश आले.ईश्वरपूर येथील रसिकाचे तुकाराम वाटेगावकर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रसिका ही वारंवार तुकारामकडून पैसे मागत असल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाला कंटाळून तुकारामने तिला पैसे देतो, असे सांगून शेतातील शेडमध्ये बोलावले. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि आरोपीने रसिकाचा गळा आवळून खून केला, अशी कबुली पोलिसांसमोर दिली. यानंतर आरोपीने मृतदेह दुचाकीवर ठेवून ताकारी येथील कृष्णा नदीवरील पुलावरून दुचाकीसह नदीत फेकला. शोध मोहिमेदरम्यान दुचाकी प्रथम सापडली, मात्र मृतदेह आढळला नव्हता.शोधमोहीम तीन दिवस अखंड सुरू होती. नदीच्या पाण्याचा वेग, पाणीपातळी व मृतदेह विघटनामुळे शोधकार्य कठीण होते. अखेर शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास मृतदेह ताकारी पुलापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर मसुचीवाडी घाटाजवळ सापडला. या मोहिमेत बोरगाव ग्रामपंचायत यांत्रिक बोट कर्मचारी अर्जुन वाझे, शंकर बायदंडे आयुष हेल्पलाइन, कुपवाड सांगली येथील अविनाश पवार, सूरज शेख, सीमनाथ ऐवळे, प्रमोद ऐवळे, जमीर बोरगावे, नरेश पाटील, हिमांशू कुरळपकर, चिंतामणी पवार यांनी व पोलिसांच्या तुकडीने विशेष परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समाधान घुगे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Love affair leads to murder, body found in river.

Web Summary : A married woman was murdered due to a love affair. Her body was thrown into the Krishna River and found after three days. The accused confessed. Police are investigating.