शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

सांगलीत टोळीयुद्धातून तरुणाचा खून-- भरदिवसा थरारनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 9:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहरात शुक्रवारी भरदिवसा टोळीयुद्धाचा भडका उडाला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड व सावंत टोळीचा सदस्य बाळू भोकरे व त्याच्या तीन साथीदारांवर सावंत प्लॉट परिसरातील प्रतिस्पर्धी टोळीने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात भोकरेचा साथीदार शकील सरदार मकानदार (वय ३४, रा. साई मंदिरजवळ, शंभरफुटी रस्ता, सांगली) ठार झाला. ...

ठळक मुद्देशकील मकानदार हा बाळू भोकरेचा विश्वासू साथीदार या घटनेवेळी रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. परिसरातील रहिवाशांनी दरवाजे बंद करुन घेतले.नावे निष्पन्न होतील, त्यांना अटक केली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहरात शुक्रवारी भरदिवसा टोळीयुद्धाचा भडका उडाला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड व सावंत टोळीचा सदस्य बाळू भोकरे व त्याच्या तीन साथीदारांवर सावंत प्लॉट परिसरातील प्रतिस्पर्धी टोळीने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात भोकरेचा साथीदार शकील सरदार मकानदार (वय ३४, रा. साई मंदिरजवळ, शंभरफुटी रस्ता, सांगली) ठार झाला. सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस मराठा सेवा संघाच्या कार्यालयासमोर दुपारी दीड वाजता ही थरारक घटना घडली.

प्रतिस्पर्धी टोळीतील दहा ते पंधराजणांनी हल्ला चढविल्याने बाळू भोकरे व त्याच्या तीन साथीदारांनी गल्ली-बोळाचा आधार घेत पलायन केले. हल्लेखोरांनी त्यांच्या दोन दुचाकींची शस्त्राने मोडतोडही केली. इंदिरानगर, सावंत प्लॉट, शंभरफुटी रस्ता या परिसरात वर्चस्व किंवा सावकारी या कारणांवरून हा खून झाल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली. भरदिवसा टोळीयुद्धातून खून झाल्याचे समजताच पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने, विश्रामबागचे सहायक निरीक्षक अभिजित देशमुख व गुंडाविरोधी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृत मकानदार व त्याच्या साथीदाराच्या दोन दुचाकी होत्या. मकानदार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डोक्यात, कानाजवळ धारदार शस्त्राने हल्ला केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.

शकील मकानदार हा बाळू भोकरेचा विश्वासू साथीदार होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा सावंत प्लॉट परिसरातील एका टोळीशी वर्चस्वातून वाद सुरू होता. या वादातून एकमेकांच्या साथीदारांना चिडवणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू होते. शुक्रवारी सकाळीही असाच प्रकार घडला. त्यामुळे बाळू भोकरे व मकानदार विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर बाळू व मकानदार तेथून इंदिरानगर परिसरात आले. बाळूने आपल्याविरुद्ध तक्रार केल्याची कुणकुण प्रतिस्पर्धी टोळीला लागली. दुपारी दीड वाजता बाळू भोकरे, शकील मकानदार व अन्य दोघे असे एकूण चौघेजण दोन दुचाकीवरून मराठा सेवा संघाच्या कार्यालयापासून निघाले होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी टोळीतील दहा ते पंधराजणांनी गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.सांगलीत टोळीयुद्धातून तरुणाचा खूनटोळीने भोकरेसह चौघांना लक्ष्य केले; पण बाळूसह तिघांनी तेथून पलायन केले. मकानदार त्यांच्या तावडीत सापडला. टोळीने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, कानाजवळ वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेवेळी रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. परिसरातील रहिवाशांनी दरवाजे बंद करुन घेतले. शकीलच्या भावाने घटनास्थळी आक्रोश सुरू केला. मृतदेह हलविण्यास विरोध केला. शासकीय रुग्णालयातही त्याने विच्छेदन तपासणी करण्यास विरोध केला. पोलिसांनी त्याची समजूत काढल्यानंतर तो शांत झाला.बाळू भोकरे पोलिस ठाण्यातबाळू भोकरे सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांची नावे त्याने घेतली आहेत. परंतु पोलिस त्याने दिलेली माहिती तपासत आहेत. त्याची फिर्यादही घेतली जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंद नव्हती. त्यामुळे खून कोणी केला, त्यामागे काय कारण आहे, याचा तपशील मिळू शकला नाही.नगरसेवकांचा ठिय्यापोलिसांनी हल्ला करणाºया प्रतिस्पर्धी टोळीतील काही जणांना तसेच बाळू भोकरेला चौकशीसाठी पाचारण केले होते. पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत चौकशी सुरू होती. त्यावेळी राष्टÑवादीचे नगरसेवक राजू गवळी, शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी व बाळू व ऊर्फ महिंद्र सावत हेही सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्याबाहेर कट्ट्यावर ठिय्या मांडून बसले होते. बाळू भोकरे त्यांच्यापासून दूर बसला होता.कोणाचीही गय नाही : शिंदेजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले की, मकानदारच्या खुनाची घटना अत्यंत गंभीर आहे. दहा ते पंधराजणांनी हल्ला केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुलीची छेड, टोळ्यांमधील वर्चस्ववाद, रागाने पाहणे व सावकारी ही कारणे खुनामागे असू शकतात. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरु होती, अशी माहिती मिळाली आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्यांना अटक केली जाईल. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील.