दिघंचीत ‘लाेकमत’च्या शिबिरात २५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:34+5:302021-07-05T04:17:34+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञास रविवारी ...

दिघंचीत ‘लाेकमत’च्या शिबिरात २५ जणांचे रक्तदान
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञास रविवारी माेठा प्रतिसाद मिळाला. दिघंचीतील महादेव मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास मोरे, संजय वाघमारे, नागराज वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. रक्तदानासाठी रोहित देशमुख, नागराज वाघमारे, संजय वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिबिरात दिलीप गाढवे, राजन गुट्टेदार, रोहित देशमुख, हणमंत मोरे, नानासाहेब पिसे, राजू कुचेकर, राहुल (पिंटू) मोरे, लखन तुपे, नागराज वाघमारे, हणमंत लोखंडे, अभिजित डोंबे, अविनाश वाघमारे, शर्वील वाघमारे, शंकर मोरे, अमोल ढोले, विशाल वाघमारे, रवींद्र भोसले, समृद्धी जाधव, गणेश शिंदे, भास्कर मोरे, चंद्रकांत पुसावळे, मंगेश रणदिवे, अमित वाघमारे, संजय वाघमारे, विशाल शिंदे यांनी रक्तदान केले.
फोटो : ०४ दिघंची १
ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे ‘लोकमत’तर्फे रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.