बिचूद येथे २५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:08+5:302021-07-23T04:17:08+5:30

इस्लामपूर : बिचूद (ता. वाळवा) येथे सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान ...

Blood donation of 25 people at Bichud | बिचूद येथे २५ जणांचे रक्तदान

बिचूद येथे २५ जणांचे रक्तदान

इस्लामपूर : बिचूद (ता. वाळवा) येथे सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हरिभाऊ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कऱ्हाड येथील महालक्ष्मी ब्लड बँक यांच्याकडून रक्तसंकलन करण्यात आले.

सुशांत सावंत, नवनाथ सावंत, गौरव पाटील, प्रदीप सावंत, दादासाहेब सावंत, सुशांत पाटील, श्रेयश सावंत, अतुल इंगळे, आदित्य कांबळे यांच्यासह २५ युवकांनी यावेळी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन सौरभ सावंत, श्रेयश सावंत, सुशांत पाटील व युवकांनी केले होते. जयंत दारिद्र्य निर्मूलनचे संघटक अनिल जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी युवराज गोडसे, प्रकाश पाटील, गौरव पाटील, शुभम पाटील, शुभम सावंत, हर्षल रसाळ उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 25 people at Bichud