इस्लामपुरात मित्राच्या वाढदिनी २० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:25+5:302021-04-19T04:24:25+5:30

इस्लामपूर येथील रक्तदान शिबिरावेळी डॉ. पी. टी. शहा, विक्रम सावंत, डॉ. अतुल मोरे, उमेश कुरळपकर, दीपक कोठावळे, जयवंत रोकडे ...

Blood donation of 20 people on a friend's birthday in Islampur | इस्लामपुरात मित्राच्या वाढदिनी २० जणांचे रक्तदान

इस्लामपुरात मित्राच्या वाढदिनी २० जणांचे रक्तदान

इस्लामपूर येथील रक्तदान शिबिरावेळी डॉ. पी. टी. शहा, विक्रम सावंत, डॉ. अतुल मोरे, उमेश कुरळपकर, दीपक कोठावळे, जयवंत रोकडे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील युवा उद्योजक विक्रम रघुनाथ सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणींना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २० जणांनी रक्तदान करत रक्ताचा तुटवडा कमी करण्यामध्ये खारीचा वाटा उचलला.

येथील राजारामबापू रक्तपेढीमध्ये डॉ. पी. टी. शहा, डॉ. अतुल मोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. या शिबिरात सूरज देशमुख, अक्षय सावंत, जयदीप तळप, राकेश पवार, सत्यजित सकपाळ, प्रतिमा गोरे, मयूरी जाधव, विश्वजित थोरात, केतन पाटील, प्रशांत नरुटे, कृष्णात बल्लाळ, विनायक जाधव, संदीप कोठारी, अतुल मोरे यांनी रक्तदान केले.

उमेश कुरळपकर, दीपक कोठावळे, जयवंत रोकडे, विजय कुंभार, पवण गुरव, सचिन पवार, विजय महाडिक, सागर जाधव, संदीप मासाळ यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 20 people on a friend's birthday in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.