कुपवाड : रद्द झालेले राजकीय आरक्षण ओबीसींना पुन्हा देण्यात यावे, या मागणीसाठी कुपवाड शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी शहरातील संत रोहिदास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा जोरदार घोषणा देऊन चौक दणाणून सोडला होता.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, गजानन मगदूम, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, भाजपचे शहर अध्यक्ष रवींद्र सदामते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर न केल्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे. तसेच भविष्यात राजकीय आरक्षणाप्रमाणे शैक्षणिक आणि नोकरीमधील आरक्षणदेखील रद्द होण्याची शक्यता असून, समाजाचे नुकसान होणार आहे.
यावेळी आंदोलकांनी राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा जोरदार घोषणा देऊन चौक दणाणून सोडला.
आंदाेलनात नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, कल्पना कोळेकर, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, विश्वजित पाटील, सुभाष गडदे, कुपवाड शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दादासाहेब रुपनर, माजी नगरसेवक मोहन जाधव, कुपवाड शहर महिला अध्यक्ष ललिता कांबळे, महेंद्र पाटील, आकाराम सायमोते, बापू हाक्के, हणमंत सरगर, दादासाहेब ओलेकर, सुखदेव काळे, स्वप्निल मगदूम, सागर सायमोते, शोभा बिक्कड, ललिता मासाळ, सुनीता रुपनर, शकुंतला काशीद, सुवर्णा गायकवाड सहभागी झाले होते.
फोटो : २६कुपवाड १
ओळ : कुपवाडमध्ये भाजपच्यावतीने शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश ढंग, गजानन मगदूम, रवींद्र सदामते, कल्पना कोळेकर, विश्वजित पाटील, सुभाष गडदे उपस्थित होते.