सांगली : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कचखाऊ धोरण स्वीकारले होते. आता आरक्षणाबाबत समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी सांगितले.शिंदे म्हणाले की, फडणवीस सरकारने घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे.मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करण्याची गरज आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 17:54 IST
Maratha Reservation Bjp Sangli : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कचखाऊ धोरण स्वीकारले होते. आता आरक्षणाबाबत समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार
ठळक मुद्देमराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणारमहाआघाडी सरकारकडून कुचराई : दीपक शिंदे-म्हैसाळकर