भाजपच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:56+5:302021-06-26T04:19:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या शहर चिटणिसासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे ...

भाजपच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या शहर चिटणिसासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पक्षप्रवेश करणाऱ्यांत भाजप ओबीसी मोर्चाचे सांगली शहर चिटणीस रोहित घुबडे-पाटील, शहर जिल्हा सरचिटणीस रोहन संकपाळ, शहर जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, चिटणीस प्रतीक चव्हाण, अजिंक्य करजगार यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी मनसेतून भाजपत प्रवेश केला होता. आता त्यांची घरवापसी झाली आहे.
जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा आपला एकच गट असेल. भूतकाळ विसरून भविष्यातील नवनिर्माणाच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावे. सर्व मतभेद विसरून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, मराठी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल शिंदे, प्रसाद खवाटे, धीरज घोडके, विजय मौर्य, निखिल कुलकर्णी, अमित पाटील आदी उपस्थित होते.