शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का; तीन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा, आमदार पडळकरांचे विश्वासू समर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:23 IST

हे प्रमुख तीन पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू समर्थक

विटा : खानापूर मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कलह निर्माण झाला असून पक्षाचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे व विटा शहराध्यक्ष सौ. अर्चना पंकज दबडे या तीन प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.या राजीनामा सत्राचे नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी याला पक्षांतर्गत कुरघोड्या व गटबाजीची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. हे प्रमुख तीन पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू समर्थक असल्याने आमदार पडळकर गटाला धक्का बसला आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांचे विटा येथील खंदे समर्थक पंकज दबडे हे भाजपचे जिल्हा सचिव तर त्यांच्या पत्नी सौ. अर्चना दबडे या भाजपच्या विटा शहराध्यक्षा म्हणून पदावर कार्यरत होत्या. तसेच खानापूरचे संदीप ठोंबरे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करीत होते. हे तीनही प्रमुख पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय समर्थक मानले जात होते. या तिघांनी एकाच वेळी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

पुढील राजकीय भूमिका काय..या राजीनामा सत्रानंतर पंकज दबडे यांनी येत्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पंकज दबडे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.