शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:43 IST

काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र सत्तेत 

मिरज: मिरज पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदी निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत भाजपला धक्का दिला. सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा तर उपसभापतीपदी शिंदेसेनेच्या ललिता शेजुळ यांनी भाजपाचे पांडुरंग पाटील यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवार अकरा विरुद्ध दहा मतांनी विजयी झाले. अपहरण झाल्याची तक्रार झालेले शिंदेसेनेचे एक सदस्य पांडुरंग इंगळे हे मतदानास अनुपस्थित होते. मिरज पंचायत समितीच्या २२ सदस्यांपैकी भाजपचे सर्वाधिक दहा सदस्य निवडून आले होते. शिंदेसेनेचे दोन सदस्य  असल्याने शिंदेसेनेच्या मदतीने भाजपचा सभापती निश्चित होता. मात्र दहा सदस्य असलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तीन, काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे चार असे एकत्र आले. त्यांना शिंदेसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा देत भाजप उमेदवारांचा पराभव केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.तन्वी कमलेकर सर्वात तरुण सभापती  तन्वी कमलेकर या केवळ २१ वर्षे वयाच्या असून त्या सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत. निवडीनंतर खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितरावं घोरपडे,  राष्ट्रवादीचे मनोजबाबा शिंदे, शिंदेसेनेचे मोहन व्हनखंडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

वाचा: तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवडजिल्हा परिषदेतही असाच निकाल दिसेल - विशाल पाटील भाजपच्या पैसा व दहशतीचा अंत होण्यास सुरुवात झाली असून मिरज पंचायत समितीत पुरोगामी विचार जिंकला आहे. जिल्हा परिषदेतही असाच निकाल दिसेल असा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला. पैशाचा प्रचंड वापर करून भाजपने निवडणुकीची पद्धतच बदलली आहे. याला रोखण्याचा प्रयत्न मिरज पंचायत समितीत आम्ही केल्याचे माजी मंत्री अजितरावं घोरपडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP loses Miraj election; Congress' Tanvi Kamlekar wins chairperson post.

Web Summary : In a twist, Congress' Tanvi Kamlekar defeated BJP's Rani Bhore for Miraj Panchayat Samiti chairperson. Alliances led to an 11-10 victory, marking a setback for BJP. Kamlekar, 21, is the youngest chairperson.