शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीत स्वकीयांचे कान पिळले, खासदार संजयकाकांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 15:58 IST

पक्षीय काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले

सांगली : भाजपच्या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान देतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वकीयांचेही कान पिळले. पक्षीय कामात मागे पडलेल्या तासगाव मतदारसंघाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करीत त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांनाही इशारा दिला. त्यामुळे खासदारांबाबत वरिष्ठ स्तरावरही नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.भाजपने गेल्या काही दिवसांत अनेक अभियान राबविली आहेत. ‘धन्यवाद मोदी’ या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबीयांच्या भेटीगाठी, बुथ सदस्यांची संख्या वाढविणे, कुटुंब पालकत्व योजना असे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात सध्या विविध कार्यक्रमांचे ९० टक्के उद्दिष्ट भाजपने पूर्ण केले आहे.शिल्लक १० टक्के काम हे तासगाव मतदारसंघातील आहे. कवठेमहांकाळमधूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन्ही तालुके खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड मानले जातात. याठिकाणी कोणतेही पक्षीय काम करताना त्यांना विश्वासात घ्यावे लागते. तरीही हे दोन्ही तालुके अन्य तालुक्यांपेक्षा मागे आहेत.खासदार पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीत अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर त्याचा गाजावाजा झाला. मात्र, पक्षीयस्तरावर दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कमी पडल्याने त्याची पक्षांतर्गत चर्चा सुरु आहे.भाजपच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात आ. गोपीचंद पडळकर यांनीही या गोष्टीवरुन खासदारांना चिमटा काढला. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणारे बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा त्यांच्या गावातील बुथचे प्रमुख आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.काहींना घरबसल्या तिकीट, काहींना घरचा रस्ताबावनकुळे यांनी सभेत पक्षीय काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले. ज्या नेत्याकडे पक्षीय काम करण्याची क्षमता, लोकांशी सुसंवाद साधण्याची कला व ज्यांनी चांगले काम केले असेल त्यांना घरात बसून तिकीट मिळेल. मात्र, जे काम करणार नाहीत, अशा कोणत्याही मोठ्या नेत्याला घरी बसविले जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय सात मतदारसंघात विजयाची खात्री काही पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर बावनकुळे यांनी एक मतदारसंघ कोणता राहिला, असा सवाल करीत तिथेही विजय हवा, अशी सूचना दिली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे