शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मोदींच्या पोस्टरला काळं फासणाऱ्या सत्यजित तांबेंच्या प्रतिमेचं भाजपाकडून दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या प्रतिमेचे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने दहन करण्यात आले.

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या प्रतिमेचे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने दहन करण्यात आले. तांबे यांच्यासह काँग्रेसच्या एकूणच आंदोलनपद्धतीचा निषेध व्यक्त करत भाजपानंही निदर्शने केली. राजवाडा चौकात शुक्रवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या आंदोलनादरम्यान तांबे मोदींच्या प्रतिमेस काळे फासले होते. याचा निषेध भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तांबे यांच्या प्रतिमेचे दहन करुन त्यांच्याविरोधात निदर्शने केली. 

(मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध)

युवा मोर्चाचे अध्यक्ष जयगोंड कोरे म्हणाले की, संपूर्ण जगात भारताची मान उंचावेल अशी नवीन ओळख पंतप्रधानांनी करून दिली आहे. तरी पंतप्रधानांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.  तर सरचिटणीस चेतन माडगुळकर म्हणाले, पंतप्रधान हे पद संविधानिक असून अखंड भारताचे नेतृत्व करणा-या पंतप्रधानांचा अशा प्रकारे अपमान जनता कधीही सहन करणार नाही व असे कृत्य करणा-यांना वेळीच उत्तर मिळेल. 

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पेट्रोल पंपावर केली दगडफेक )

भांबावलेल्या काँग्रेस पक्षाने स्वत:चे चारित्र्य एकदा तपासून पाहावे व पंतप्रधान या संविधानिक पदाचा कायम मान राखावा, असे आवाहनही यावेळेस भाजपाकडून करण्यात आले. शिवाय,काँग्रेस व त्यांच्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत घोषणाबाजीही करण्यात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSatyajit Tambeसत्यजित तांबेBJPभाजपाFuel Hikeइंधन दरवाढ