भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:01 AM2020-07-15T01:01:06+5:302020-07-15T01:01:37+5:30

आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला.

BJP MLA Padalkar in controversy again; Mockery from netizens, greetings to Tilak as Agarkar | भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली

भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली

Next

सांगली : शरद पवारांवरील टीकेमुळे राष्टÑवादी कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. मंगळवारी थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती होती. टिष्ट्वटरवर त्यांना अभिवादन करताना पडळकरांनी लोकमान्य टिळकांचा फोटो टाकल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला.
आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला. ही पोस्ट शेअर होताच टिष्ट्वटरवर सर्वाधिक चर्चेत आली. नेटकºयांनी यावरून पडळकरांना ट्रोल केले. नेटकºयांच्या टीकेमुळे लगेचच पडळकरांनी पोस्ट डिलिट केली. त्याजागी नवी पोस्ट आगरकरांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केली. तरीही प्रसिद्ध झालेल्या जुन्या पोस्टवरून दिवसभर पडळकरांचा समाचार नेटकरी घेतच राहिले.

Web Title: BJP MLA Padalkar in controversy again; Mockery from netizens, greetings to Tilak as Agarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.