शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

जतमध्ये गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा ३७ हजारांनी केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:09 IST

जत : जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३७ हजार ८८१ ...

जत : जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३७ हजार ८८१ मतांनी दारुण पराभव केला. जतचा निकाल हा धक्कादायक ठरला आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेस निधी, लाडकी योजना व उमदी येथे एमआयडीसी उभारण्याच्या संकल्पनेने पडळकर यांना जत तालुक्यातून आघाडी मिळाली आहे.जत मतदारसंघ खुला झाल्यानंतर दुसऱ्यांदा उभारलेल्या उमेदवाराचा पराभव झाला. तीच परंपरा जत तालुक्यात पुन्हा चौथ्यांदा झाली आहे. विक्रम सावंत यांचा दारुण पराभव झाला. पहिल्यांदा जत मतदारसंघ खुला झाल्यानंतर २००९ मध्ये प्रकाश शेंडगे हे १८ दिवसांत आमदार झाले. त्यानंतर २०१४ ला विलासराव जगताप निवडून आले. २०१९ साली विक्रम सावंत निवडून आले. आता मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर तयारी सुरू केलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन महिन्यांत चांगले वातावरण निर्माण करत बाहेरच्या मतदारसंघातील पडळकर हे निवडून आले.पहिल्या फेरीत गोपीचंद पडळकर यांना ८२८ मतांनी आघाडी मिळाली ती २१ व्या फेरीअखेर वाढतच गेली. प्रत्येक फेरीत त्यांची मते वाढत गेली. फक्त दहाव्या फेरीत विक्रम सावंत यांना मताधिक्य मिळाले. अखेर गोपीचंद पडळकर यांना ३७ हजार १०३ मतांची आघाडी मिळाली.अखेर गोपीचंद पडळकर यांना ३७ हजार १०३ मतांनी आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाल्यावरच पडळकर समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सात ते आठ जेसीबी मशीन आणण्यात आल्या. त्याचबरोबर डीजेचा आवाज घुमू लागला. कार्यकर्त्यांचा उत्साह प्रत्येक फेरीअखेर वाढतच होता. १८ व्या फेरीनंतर पडळकर हे तहसील कार्यालयात जात असतानाच कार्यकर्त्यांनी त्याच्यावर गुलालाचा वर्षाव केला. 

विजयाची कारणे

  • गोपीचंद यांना निवडून दिल्यावर विधान परिषदेवर आणखी एक जत आमदार घेण्याची घोषणा
  • लाडकी बहीण योजना पथ्यावर पडली
  • धनगर समाजाची मते पथ्यावर  

पराभवाची कारणे

  • विकासकामांचा निधी मिळाला नाही.
  • सावंत यांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय स्वत: घेतले.
  • मतदारांशी फटकळ बोलणे हे पराभवाचे मुख्य कारण.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024jat-acजाटGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024