शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Vidhan Parishad Election: विधान परिषदेचा पत्ता कापल्याने भाजपचे नेते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:08 IST

वाळवा, शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु पक्षाने पत्ता कापल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांना शह देण्यासाठी विधान परिषदेवर जाण्यासाठी वाळवा, शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु पक्षाने पत्ता कापल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचा गट बळकट आहे. शिराळा मतदारसंघात आ. मानसिंगराव नाईक व नुकतेच राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक या नेत्यांचे गट सक्रिय आहेत. त्यात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भर पडली आहे.राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. मागील निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली होती. विधान परिषदेवर जाण्यासाठी जोरात मोर्चेबांधणी करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांच्याही पदरात काही पडले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटत आहे.भाजपने यापूर्वी सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनाही आश्वासने दिली आहेत. परंतु ती हवेत विरली आहेत. विधान परिषदेचा पत्ता कापल्याने सम्राट महाडिक यांच्या पदरीही निराशा आली आहे. 

सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु उमेदवारी देणे हा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे, तो स्वीकारला पाहिजे. भविष्यात वाळवा, शिराळ्याला भाजपकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा. - सम्राट महाडिक, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजप

टॅग्स :SangliसांगलीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपा