शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:54 IST

महापालिका निवडणुकीत काय होणार?

सांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना बंडखोरीचा मोठा फटका बसल्याने त्यांच्या समर्थकांनी पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदेसेना या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क वाढला आहे. पाटील यांच्या संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या रांगोळीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गर्दी केल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया ताणल्या गेल्या.गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानीही सत्ताधारी नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे असले तरी मागील दहा वर्षात ते जेवढे पक्षात सक्रिय होते तेवढे आता नाहीत. आंदोलने, बैठका, पक्षीय कार्यक्रम यांच्या नियोजनापासून ते दूर झाले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एका बाजूला पृथ्वीराज पाटील यांचा गट तर दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांचा गट आहे. या दोन्ही गटांमधील संघर्ष कायम आहे. खासदार विशाल पाटील यांचाही भाजप नेत्यांशी सलोखा वाढल्याने तसेच त्यांना भाजप प्रवेशाच्या उघड ऑफर मिळत असल्याने महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवरूनही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी त्यांची सलगी भविष्यातील वेगळ्या भूमिकेचे संकेत देणारी ठरत आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या मिरजेतील संस्थेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वविक्रमी रांगोळीचा उपक्रम पार पडला. रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते मकरंद देशपांडे आदी भाजप नेत्यांनी हजेरी लावली.त्याच दिवशी शिंदेसेनेचे नेते पर्यटन तथा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांचा काँग्रेस शहराध्यक्षांशी जुळलेला स्नेहबंध नव्या समीकरणाचे संकेत देत आहे.

महापालिका निवडणुकीत काय होणार?सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत प्रदीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मागील निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविली, तरीही काँग्रेसचे अस्तित्व महापालिकेत दिसून आले. पक्षातील फुटीचे चित्र पाहता महापालिका निवडणुकीत पक्षाची मोट बांधणे काँग्रेस नेत्यांना कसरतीचे ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा