शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
5
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
6
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
7
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
8
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
9
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
10
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
11
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
12
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
13
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
14
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
15
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
17
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
19
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
20
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भाजप नेते, माजी नगरसेवकांकडून बोगस मतदारांची नोंदणी, नितीन मिरजकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:18 IST

नावे रद्द न केल्यात न्यायालयात जाणार

सांगली : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत बोगस व दुबार नावे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. भाजप नेते, माजी नगरसेवकांनी स्वत:च्या फायद्यासाठी शिक्षण संस्थेतील कर्मचारी, ग्रामीण भागातील मतदारांची शहरात नोंदणी केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी पत्रकार बैठकीत केला. निवडणूक आयोगाने बोगस व दुबार नावे तात्काळ रद्द करावीत, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.मिरजकर म्हणाले की, काही प्रस्थापित राजकीय नेते, माजी नगरसेवकांनी प्रशासनाशी संगनमत करून महापालिका हद्दीत रहिवासी नसतानाही आपल्या समर्थकांची नावे मतदार यादीत बेकायदेशीर समाविष्ट केली आहेत. प्रत्येक प्रभागात ५०० ते १ हजार बोगस मतदार आहेत. एका भाजपच्या नेत्याने त्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची नावे प्रभाग ८, ९, १० व १४ मध्ये नोंदविली आहेत. त्या नेत्यांच्या स्वीय सहायक मिरजेचा रहिवासी असताना त्यांचे नाव सांगलीच्या प्रभागात आहे. भाजपचा एक कार्यकर्त्यांचे नाव सांगली-मिरजेच्या यादीत आहे. मिरज मतदारसंघ व कोल्हापूर, कर्नाटकातील मतदारांची नावेही यादीत घुसडली आहेत.बोगसगिरी करण्यासाठी संबंधित मतदारांची नोंद करताना वडिलाऐवजी आईचे नाव नमूद केले आहे. त्यासंदर्भातील पुरावे आम्ही सादर केले आहेत. यावेळी ॲड. अभिषेक खोत, काँग्रेसचे रोहित नगरकर, रवी खराडे, शिवसेना ठाकरे गटाचे रुपेश मोकाशी, अनिल माने उपस्थित होते.

बोगस मतदारांची नावे समावेश करणाऱ्यांवर कारवाई कराएका माजी नगरसेवकाने जत तालुक्यातील बाज, बनाळी येथील मतदारांची नावे महापालिकेच्या यादीत समाविष्ट केली आहेत. वास्तविक हे मतदार महापालिका क्षेत्रातील रहिवासी नाहीत. याबाबत आम्ही निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहेत. प्रशासनाने दुबार व बोगस नावे शोधून ती त्वरित रद्द करावीत. बोगस मतदारांची नावे समावेश करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारही मिरजकर यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Bogus voter registration alleged by BJP leader, ex-corporator.

Web Summary : Nitin Mirajkar alleges BJP leaders registered bogus voters for political gain. He threatens legal action if the Election Commission fails to act against the fraudulent registrations, including those from outside Sangli.