शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्या नीता केळकर यांच्या पुत्राची ३६ लाखांची फसवणूक, हरयाणातील पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:21 IST

पैसे घेऊनही वाहनांचे सुटे भाग पुरविले नाहीत

सांगली : दुचाकीचे सुटे भाग न पुरविता सांगलीतील वितरकाची ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुग्राम (हरयाणा) येथील पाच जणांविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल झालाआहे. सारंग श्रीरंग केळकर (वय २८, रा. राजनगर, चिंतामणीनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली. भाजप नेत्या नीता केळकर यांचे ते सुपुत्र आहेत.जितेंद्र शर्मा, रूपाली शर्मा, राजेश शर्मा, अभिमन्यू बादल, विकास रात्रा (सर्व मूळ रा. काॅर्पोरेट कार्यालय, गेरगाव, सध्या रा. एअर इंडिया कार्यालयाशेजारी, गुरुग्राम, हरयाणा), अशी संशयितांची नावे आहेत. फसवणुकीचा प्रकार ५ मार्च २०२१ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत घडला. सारंग केळकर हे विद्युत दुचाकींचे सांगलीतील वितरक आहेत. माधवनगर रस्त्यावर त्यांचे शोरूम होते. त्यासाठी ते संशयितांकडून वाहने आणि त्यांचे सुटे भाग खरेदी करीत होते. वाहनांसाठी त्यांनी संशयितांच्या ओकिनावा ऑटोटेक या कंपनीकडे दोन लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. सुट्या भागांसाठी ३ लाख १३ हजार ३११ रुपये भरले होते. दुचाकी खरेदीसाठी २२ लाख ६७ हजार रुपये भरले. संशयितांनी त्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचे क्रमांक दिले होते. त्यावर सारंग केळकर यांनी वेळोवेळी पैसे भरले.दरम्यान, सांगलीत विक्री झालेल्या काही दुचाकींचे सुटे भाग ग्राहकांना केळकर यांनी स्वत:च्या खर्चाने दिले. ही रक्कम सुमारे ८ लाख ६ हजार ३७४ रुपये होते. हे सर्व पैसे कंपनीकडून मिळावेत, पैसे भरल्यानुसार वाहनांचे सुटे भाग व दुचाकी मिळाव्यात यासाठी त्यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला; पण संशयितांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा एकत्रित आकडा ३५ लाख ८६ हजार ६८५ रुपये होतो. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस