शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

भाजपचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणणार - विश्वजीत कदम 

By अशोक डोंबाळे | Updated: September 7, 2023 18:01 IST

तालुक्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार

सांगली : भाजपचा नाकर्तेपणा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांसमोर आणला. आता आम्ही भाजपचा हाच नाकर्तेपणा ग्रामीण भागातील जनतेसमोर मांडणार आहे. त्यासाठी उद्या, दि. ८ ते १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील जनतेशी चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.डॉ. कदम म्हणाले, जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढून काँग्रेस पक्ष मजबूत करणार आहे. तसेच तरुण मतदारांना खोटी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल जनजागृती करणार आहे. दहा तालुक्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात रोज ३० किलोमीटर चालणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रत्येक तालुक्यात रोज सायंकाळी सभा आहे. दि. ८ रोजी मिरज तालुका, दि. ९ रोजी जत, दि. १० रोजी आटपाडी, दि. ११ रोजी कडेगाव, दि. १२ रोजी तासगाव-कवठेमहांकाळ, दि. १३ रोजी शिराळा-वाळवा, आणि दि. १४ रोजी पलूस तालुका आणि त्याच दिवशी सांगलीत जनसंवाद यात्रेची सांगता आहे. दरम्यानच्या काही सभांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसBJPभाजपा