शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा पेच सुटला; भाजपची सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी, महाआघाडीच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:56 IST

मिरजेतून खाडे चौथ्यांदा मैदानात, शिवाजी डोंगरे यांचे बंडखोरीचे संकेत

सांगली : यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सांगलीतील उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला होता. पक्षाने सर्व चर्चांना पूर्णविराम देत सांगलीची उमेदवारी पुन्हा गाडगीळ यांनाच जाहीर केल्याने येथील कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला आहे, तर मिरजेतून अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री सुरेश खाडे यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.यंदा विधानसभेला लढणार नसल्याचे सांगून आमदार गाडगीळ यांनी खळबळ उडवून दिली होती. हा निर्णय मागे घेण्यासाठी अनेकांनी त्यांना साकडे घातले. परंतु, ते ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.भाजपमधील इच्छुक शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, शेखर इनामदार, धीरज सूर्यवंशी यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यांच्या पदरी निराशा आली आहे. मात्र, पृथ्वीराज पवार यांनी गाडगीळ यांच्या उमेदवारीच्या निर्णयाचे स्वागत केले.

एकीकडे भाजपने सांगली, मिरजेची उमेदवारी जाहीर केली असताना, विरोधी महाआघाडीत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत तिकिटासाठी पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी दावेदारी केली आहे. परंतु, उमेदवारीचा फैसला वरिष्ठांच्या कोर्टात गेला आहे.

खाडे, गाडगीळ यांचा सामना कोणाशी?गाडगीळ आणि खाडे यांच्याविरोधात महाआघाडीतून कोण मैदानात उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गाडगीळ यांची लढत पृथ्वीराज पाटील की, जयश्री पाटील यांच्याशी होणार? की तिरंगी लढत, याची चर्चा रंगली आहे. खाडे यांचा सामना मोहन वनखंडे की, अन्य कोणाशी होणार, याकडेही लक्ष लागले आहे.

पक्षादेश अंतिम : सुधीर गाडगीळनिवडणूक न लढविण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. पण, पक्षादेश अंतिम असल्याने तो मान्य करून उमेदवारी स्वीकारत माझा निर्णय मागे घेतो. निवडणुकीला मी जनतेसमोर येत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार गाडगीळ यांनी व्यक्त केली.शिवाजी डोंगरे यांचे बंडखोरीचे संकेतपक्षाचा हा निर्णय मनाला वेदना देणारा आहे. अपक्ष लढणार की नाही, हा निर्णय लवकरच घेऊ, अशी ‘पोस्ट’ डाेंगरे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीmiraj-acमिरजBJPभाजपा