शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भाजप पदाधिकाऱ्याने मोहंमद पैगंबरांची तुलना केली सावरकरांशी, कारवाईसाठी पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:24 IST

'सावरकरांप्रमाणेच प्रेषित मोहम्मद पैगंबर हेसुद्धा त्रासाला कंटाळून मक्का सोडून गेले होते'

मिरज : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या नियोजन बैठकीत भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्याने प्रेषित मोहंमद पैगंबर यांची तुलना सावरकर यांच्याशी करून मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने त्याच्यावर कारवाईची मागणी एमआयएम व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांत केली.सांगलीत दोन आठवड्यांपूर्वी सावरकर गौरव यात्रेपूर्वी भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. या बैठकीत मिरजेतील भाजप अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी शाहनवाज सौदागर यांनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली नव्हती, त्यांनी चातुर्य दाखवले होते. सावरकरांप्रमाणेच प्रेषित मोहम्मद पैगंबर हेसुद्धा त्रासाला कंटाळून मक्का सोडून गेले होते, असे वक्तव्य करून शाहनवाज सौदागर यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी नेत्यांना खूश करण्यासाठी मुस्लिम व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.रमजान महिन्यात हा प्रकार करणाऱ्या शाहनवाज सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी एमआयएम व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलिसांत निवेदनाद्वारे केली. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, शकील पिरजादे, राष्ट्रवादीचे जैलाब शेख, जहीर मुजावर, नासिर शेख, मुसा समडोळे, अरकान बेग, सुलेमान मुजावर, सज्जाद बेपारी, फारुक बागवान, असलम मुल्ला उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर