शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत भाजपने केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, स्थायी सभापतीपदी धीरज सूर्यवंशी विजयी

By शीतल पाटील | Updated: September 14, 2022 17:12 IST

राष्ट्रवादीच्या नगरसेविका गैरहजर राहिल्याने फुट पडल्याचे स्पष्ट झाले

सांगली : महापालिका स्थायी समिती सभपती पदी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांचा ९ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीत फुट पडल्याचे स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा दणका बसला.  महापालिका स्थायी समिती सभापती निवडीसाठी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. राष्ट्रवादीने या निवडणूकीत काँग्रेसला पाठींबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे संख्याबळ ७ वर होते. भाजपच्यावतीने धीरज सूर्यवंशी तर काँग्रेसच्या वतीने संतोष पाटील व फिरोज पठाण यांनी उमेदवार अर्ज भरले होते. पठाण यांनी अर्ज मागे घेतल्याने सूर्यवंशी व पाटील यांच्यात थेट लढत झाली. सुर्यवंशी यांना ९ तर पाटील यांना ५ मते मिळाली.

काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली,पण..राष्ट्रवादीच्या तीन पैकी दोन नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले. पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे यांनी निवडणूकीकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीतील ही फूट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे. वर्षभरापुर्वीच महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचे सहा नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. पण स्थायी समितीवर भाजपला शह देण्यात पुन्हा एकदा आघाडीला अपयश आले.

सूर्यवंशी समर्थकांचा जल्लोषसभापती पदी निवडीनंतर धीरज सूर्यवंशी यांचा जितेंद्र डुडी, आयुक्त सुनिल पवार यांच्यासह आ. सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्यासह भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. सूर्यवंशी यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर फटाक्यांच्या आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. यावेळी सूर्यवंशी यांच्यासह भाजप नेत्यांची शहरातून मिरवणूक काढली.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस